निकाल
१. जर तुम्ही निवलेल्या पर्यायांमध्ये 'a' ची संख्या जास्त असेल तर - तुम्ही एक 'रिस्क टेकर' आहात, धाडसी आहात. भविष्यात येऊ शकणाऱ्या आर्थिक आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहात. किरकोळ नुकसान सोसून मोठ्या कालावधी नंतर अंतिमतः भरघोस आर्थिक फायदा मिळवून देणारी गुंतवणूक निवडू शकता.
एक आक्रमक गुंतवणूकदार बनण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकता. त्यासाठी लागणारे पुरेसे आर्थिक शिक्षण घेण्याची प्रक्रिया सतत चालू ठेवा .
२. जर तुम्ही निवलेल्या पर्यायांमध्ये 'b' ची संख्या जास्त असेल तर - मध्यम स्वरूपाची जोखीम पत्करण्याकडे तुमचा कल आहे. आपण पारंपारिक, सुरक्षित अशा गुंतवणूक सुविधा आणि जास्त जोखमीच्या गुंतवणूक योजना यांत योग्य तो समन्वय साधून गुंतवणूक करावी.
अर्थात कोणत्याही गोष्टीचे 'योग्य ज्ञान मिळवणे' हा त्या गोष्टीविषयी वाटणारी भीती घालवण्याची उत्तम उपाय आहे. म्हणून आर्थिक बाबतीत येथेच थांबू नका. तुमच्या पैशाविषयीच्या ज्ञानात भर घालत रहा.
३. जर तुम्ही निवलेल्या पर्यायांमध्ये 'c' ची संख्या जास्त असेल तर - अर्थविषयक ज्ञान मिळवण्याचा निश्चितच प्रयत्न करा. पैसे, धन-संपत्ती, गुंतवणूक, मोबदला इ. चे शक्य ते सर्व पैलू समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्या आणि त्यानुसार छोट्या छोट्या गोष्टी अंमलात आणण्यास सुरुवात करा.
उदा. (किमान आठवड्यातून एकदा) अर्थविषयक माहिती देणारी पुस्तके, लेख इ.चे वाचन करा. त्यास्वरूपाचे Videos भाषणे इ पाहण्यास सुरुवात करा. .
मी आपणास सांगू इच्छितो, इंटरनेट वर अशा स्वरूपाची विश्वासार्ह, खरीखुरी माहिती प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे आणि ती पण अक्षरशः फुकट.
तसेच नजीकच्या भविष्य काळात 'सुरक्षित' अशा गुंतवणुकींवर भर द्या. पैशाच्या बाबतीत कुणावरही अंधपणे विश्वास ठेवण्याऐवजी स्वतः त्याचा अभ्यास करा. (कुणाचाही गुंतणूक सल्ला अंधपणे मान्य करू नका)"
--------------------------------------------------------------------------------------------------
अर्थविषयक ज्ञान वाढविण्यासाठी काही उत्तम पुस्तके:
रिच डॅड पूअर डॅड (लेखक - रॉबर्ट कियोसाकी )
तुम्ही श्रीमंत व्हावं असं आम्हाला का वाटतं (लेखक - रॉबर्ट कियोसाकी आणि डॉनल्ड ट्रम्प)
The Parable of Pipeline (Marathi) (लेखक - Burke Hedges)